मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील सरकार का पडले, कसे पडले इथपासून ते उद्याच्या शिवसेनेच्या भवितव्यापर्यंतच्या सगळ्यांना प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. या मुलाखतीवर आता विरोधकांकडून टीका करण्यास सुरुवात केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उध्दवा ठाकरे यांच्या मुलाखतीवर टीकास्त्र डागले आहे. ते म्हणाले की, मुलाखतीपेक्षा टीजर चांगला होता. टीजरपेक्षा चित्रपट चांगला असेल असं वाटलं होतं. मात्र, चित्रपटापेक्षा टीजर चांगला होता, अशी टीका त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे अस्तित्वातच हे भाजपामुळे आहे, असे म्हणत आशिष शेलार पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोणी पालापाचोळा करत असेल तर हे महाराष्ट्राचा अपमान आहे. आत्ता सुप्रिया सुळे बोलती का, असा सवालही त्यांनी केला आहे. असो, उद्या उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हांला उदंड आयुष्य लाभो. तुमचं शरीर चांगले राहो, अशा शुभेच्छाही आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, भाजपने शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता. मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. शिवाय यावेळी त्यांनी प्रॉम्टिंग देखील केलं. यावरुनही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. माझा माईक कधी कुणी खेचला नाही. महाविकास आघाडीमध्ये समन्वय आणि सभ्यता होती, अशी टीका उध्दव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.