राजकारण

फडणवीस 'गृह मंत्री' आहेत, 'गृह बसे' मुख्यमंत्री नाहीत; कुणी केली टीका?

सामना संपादकीयमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. या टीकेचा समाचार भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी पुन्हा येईलची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर सामना संपादकीयमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. या टीकेचा समाचार भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतला आहे. अग्रलेखातून टोमणे मारणाऱ्यांना लक्षात आणून देतो. अहो, फडणवीस गृह मंत्री आहेत. "गृहबसे" "मुख्य" मंत्री नाहीत, हे विसरू नका, असा जोरदार टोला शेलारांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचे नेते असो वा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री असो आपल्याला मिळालेले प्रत्येक पद, जबाबदारी मानून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात "एसटीपेक्षा" जास्त फिरून गरीब, कष्टकरी, सामान्य माणूस, शेतकरी, श्रमिकांचे अश्रू पुसणारे, त्यांचे प्रश्न सोडवणारे, महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवसरात्र काम करणारे, देवेंद्र फडणवीस हे आज "मुख्य" असले काय आणि "उप" असले काय. ते स्वयंसेवक आहेत. त्यांना काम करण्यासाठी तुमच्या सारखी "प्रमुख" पदे लागत नाहीत. त्यामुळे देवेंद्रजींची कुणी "घरबशांनी" शिकवणी घेण्याची गरज नाही. अग्रलेखातून टोमणे मारणाऱ्यांना लक्षात आणून देतो. अहो, फडणवीस गृह मंत्री आहेत.."गृहबसे" "मुख्य" मंत्री नाहीत, हे विसरू नका.

"फडणवीस सांभाळा" असा अग्रलेखातून सल्ला देणाऱ्यांना आम्ही सांगतोय तुम्ही टोमणे, कुजकटपणा सोडा, तोंडे बंद ठेवा, जमलं तर अजून तुमच्या पत्रकार पोपटलाल यांना आवरा नाही तर नॅनोत मावेल एवढाच पक्ष उरेल. "मुख्य" होण्याची हाव, हव्यास, हावरटपणा, हपापलेपण हे कुणाचे होते, त्यांनी ते कपटाने कसे मिळवले ही काळी पाने दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तुमच्या नावाने लिहीली आहेत. स्वतः म्हणजे? होय होय मर्दासारखे स्वतःच "मुख्य" असताना पक्षाचे 40 आमदार 12 खासदार पक्ष सोडतात, नगरसेवक, मंत्री, कार्यकर्ते सगळे "जय महाराष्ट्र" करुन निघून जातात त्या अर्धग्लानी अवस्थेतून तुम्ही बाहेर अद्याप आलेले नाहीत. त्या अवस्थेत असल्यानेच तुम्हाला आपली गेलेली "मुख्य" अवस्था सतावते आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुमच्या टीकेचे विषय आहेत. तुम्ही आणि तुमचे संपादक महर्षी 'पत्रकार पोपटलाल" उठसूट सामनातून टीका करता, पण लक्षात ठेवा आम्ही एका संस्कारातून आलेले आहोत. संघ शाखेत आम्ही जे शिकलो ते तुम्ही न शिकल्याने तुमची ही अवस्था झाली आहे. भांग कधी चढते आणि कधी उतरते, देशी कशी चढते आणि कशी उतरते याचा अनुभव आम्हाला नाही. ज्यांना ती नशा माहिती आहे, त्यांनीच त्याची महती सांगितलेली बरी. आमच्याकडे अहंकाराची "देशी" नशा उतरवण्याचे औषध आहे. ते ज्यांना लागू पडलेय ते सध्या ग्लानीत बडबडत आहेत, असाही निशाणा शेलारांनी संजय राऊतांवर साधला आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी