राजकारण

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना उधाण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात सत्तातंरानंतर मनसे आणि शिंदे सरकारमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर शेलार आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली. या भेटीमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. महत्वाचे म्हणजे राज ठाकरे यांनी शनिवारीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेटही घेतली होती. मागच्या काही दिवसांत मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढल्याचे दिसून आले आहे. तर, यामुळे महापालिका निवडणुकीत नवे राजकीय समीकरण पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागच्या काही दिवसांत मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढल्याचे दिसून आले आहे. परंतु, राज ठाकरे यांनी याआधीच स्वबळाची घोषणा दिली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राज ठाकरे पोहोचले होते. पुणेकरांना महापालिकेनं पाठवलेल्या मिळकत कर वसुलीच्या नोटीसांसदर्भातील एक पत्र देण्यासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू