मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून मुंबई महापालिकांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. हा कार्यक्रम सरकारचा आहे, पण प्रचार भाजपचा सुरू आहे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
पंतप्रधान मोदी यांचे मुंबईत स्वागत आहे. या सभेसाठी मनपाच्या वॉर्डने बसेस सोडल्या. त्या बसेसवर वॉर्डचा नंबर आहे. आजचे सगळे कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्या काळात सुरुवात झाले आहे. हा कार्यक्रम सरकारचा आहे, पण प्रचार भाजपचा सुरू आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.
तर, नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेतली. यात पाठिंब्याचा निर्णय झाला. नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करेल. शुभांगी पाटील यांच्याबद्दल चमत्कार होऊन त्या विजयी होतील. भाजपने तांबे यांना फुस दिली असेल. आमच्याकडे खमका उमेदवार आहे, लाचार उमेदवार नाही, असा निशाणाही त्यांनी भाजपवर साधला आहे. भाकरीचा लढा यातूनच शिवसेनेची निर्मिती झाली आहे, असेही सावंतांनी म्हंटले आहे.