आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. विजयकुमार गावित म्हणाले होते की, दररोज मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रॉयचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील. जिला पटवायचे तिला पटवूनच घ्याल. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या.
याच पार्श्वभूमीवर आता आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. विजयकुमार गावित म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. ऐश्वर्या राय ही माझ्या मुलीसारखी आहे. फिश ऑईलचे फायदे आदिवासी लोकांना समजावून सांगत होतो. आरोग्यासाठी मासे चांगले असल्याचं मी म्हणालो. असे गावित यांनी सांगितले.