राजकारण

शिंदेंच्या वकिलांनी काय युक्तीवाद मांडला? अनिल सिंह यांनी सांगितले

शिंदे गटाच्या 16 आमदर अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी झाली आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे गटाच्या 16 आमदर अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी झाली आहे. यादरम्यान सुनावणीत काय घडले याबाबत शिंदे गटाचे वकील अनिल सिंह यांनी सांगितले आहे.

अनिल सिंह म्हणाले की, आमच्या वतीने एक अर्ज दाखल करण्यात आला. यामध्ये सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेची प्रती आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. प्रभू यांच्याकडून सर्व केसेस एकत्र चालण्याकरीता अर्ज करण्यात आला आहे.

यावर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला कागदपत्रे हस्तांतरीत करण्यासाठी एका आठवड्यांचा वेळ दिला आहे. पुढच्या तारखेनंतर ही केस कशी चालेल याचा कार्यक्रम ठरेल. त्यानंतर नियमित सुनावणी सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी