मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी वांद्रे येथील म्हाडाची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर म्हाडाकडूनही अनिल परब यांनी नोटीस देत कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी आज विधानपरिषदेत अनिल परब यांनी आक्रमक झाले व किरीट सोमय्या आणि म्हाडा विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.
वांद्रे येथील म्हाडा बांधकाम प्रकरणी चुकीची माहिती देऊन म्हाडाकडून मला नोटीस देण्यात आली. ते बांधकाम माझं नव्हतच. ५७ आणि ५८ च्या इमारत मालकांना नोटीस देण्यात आली. जनमानसात माझी प्रतिमा मलीन करण्यात आली. नोटीस देण्यापूर्वी राज्याचा माजी मंत्री म्हणून कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक होते. परंतु, कारवाईनंतर तपासणी केली असता ती जागा माझी नसल्याचे समोर आले म्हाडाने तसे पत्र मला दिले आहे. त्यामुळे मी किरीट सोमय्या आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोरीकर यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडत आहे, असे अनिल परब यांनी म्हंटले आहे.