नागपूर : ड्रग्ज रॅकेटमधील आरोपी ललित पाटीलला 9 महिने हॉस्पिटलमध्ये का ठेवलं? तो बाहेर कसा गेला? यावरुन ललित पाटीलला सरकारची, गृहखात्याची साथ आहे का? असा प्रश्न माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सरकारला केला आहे.
ललित पाटीलच्या बाबतीत ज्या काही घटना समोर येत आहे, ससूनमध्ये 9 महिने कसे ठेवण्यात आले, सरकारच्या साथ असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. आमचा सरकारवर संशय आहे. गृहखाते काय करते? सोलापूर, नाशिक, संभाजीनगरमध्ये जे ड्रग माफिया आहेत त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देशमुखांनी केली आहे. ललित पाटीलवर दबाव टाकून दुसऱ्याचे नाव घ्यायला लावतील, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.