Anil Deshmukh  team lokshahi
राजकारण

अनिल देशमुखांच्या छातीत कळ, जेलमध्येचं पडले बेशुद्ध

Published by : Shubham Tate

Anil Deshmukh : मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तत्काळ मुंबईतल्या जे-जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा रक्तदाब वाढल्याचीही माहिती मिळत आहे. डॉक्टर त्यांच्यावर सध्या उपचार करत आहेत. गेले अनेक दिवस त्यांच्या छातीतही दुखत होतं, अशी माहितीही समोर आली आहे. (Anil Deshmukh fainted in jail previously having chest pain)

दरम्यान, सकाळी 11 वाजताची ही घटना आहे. अनिल देशमुख यांना तुरुंगातच चक्कर आल्याने ते जागेवर खाली पडले. त्यानंर तेथील तुरुंग अधिकाऱ्यांनी तत्काळ डॉक्टरांना पाचारण केलं. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असताना त्यांचा अतिशय उच्च रक्तदाब होता. त्यानंतर काही वेळातच त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील दोन ते तीन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवलं जाईल, असा निर्णय जेल अॅथॉरिटीने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेवरून केंद्र सरकारवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टीका केली होती. देशमुखांना अटक करताना आधी त्यांच्यावर शिक्षण संस्थेसाठी १०० कोटी रुपयांची देणगी घेतल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतरच्या आरोपपत्रांमध्ये ही रक्कम एक कोटी १० लाख रुपयांपर्यंत आली. तेवढ्यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यांना मागील १० महिन्यांपासून तुरुंगात डांबण्यात आलं,” असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला होता. अशातच ते आॅथर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी केम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

देशमुखांवर कुणातरी व्यक्तीकडून शिक्षण संस्थेसाठी १०० कोटी रुपयांची देणगी घेतल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर या आरोपांचा तपास झाला आणि एक महिन्याने नवं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यात ती रक्कम १०० कोटी रुपये नाही, तर चार कोटी रुपये होते असं सांगण्यात आलं. आरोपपत्र १०० वरून चार कोटींवर आलं. आता १५ दिवसांपूर्वी पुन्हा नवं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि त्यात चार कोटी नाही, तर १ कोटी आणि १० लाख रुपये रक्कम असल्याचं सांगण्यात आलं,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?