राजकारण

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला आज जामीन मिळाला आहे. 50 हजारांच्या जातमुचलके व काही अटींवर न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, अमृता फडणवीस यांना धमकी देणे, लाच देण्याचे आमिष दाखवणे आरोपांखाली अनिक्षाला अटक केली होती.

नेमके काय आहे प्रकरण?

अनिक्षा जयसिंघानीया २०१५-१६ मध्ये अमृता फडणवीस यांना भेटत होती. २०२१मध्ये पुन्हा भेटीगाठी सुरु झाल्या. डिझायनर असल्याचे सांगून अनिक्षाने संपर्क केला होता. आई वारल्याचे सांगून तिने पुस्तक प्रकाशन करुन घेतले होते. अमृता यांचा विश्वास संपादन करून डिझायनर कपडे परिधान करण्यास दिले. यानंतर वडिलांना काही चुकीच्या प्रकरणात अडकवल्याचा दावा अनिक्षाने केला. यासाठी अमृता फडणवीसांना निवेदन देण्यास सांगत त्यांच्यावर दबाव आणला. वडिलांना सोडवण्यासाठी १ कोटी रुपये देण्याचा आमिषही दाखवले. परंतु, चुकीच्या प्रकारात मदत करणार नसल्याचे अमृता यांनी सांगितले, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात दिली होती.

याप्रकरणी मलबार हिल पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. यानुसार अनिक्षाला अटक करण्यात आली होती. आज तिला न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावेळी तपासात हस्तक्षेप न करण्याची व पासपोर्ट पोलिसांत जमा करण्याच्या अट अनिक्षाला घालण्यात आली आहे. अनिक्षा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Women's T20 WC 2024: आयसीसीने T20 विश्वचषकासाठी स्पेशल थीम सॉन्ग केले लॉन्च

Sharad Pawar: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; शरद पवारांचं ट्विट करत सवाल...

Chitra Wagh: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Amol Mitkari: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Varsha Gaikwad: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया