शुभम कोळी | मुंबई : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर हक्कालपट्टी आणि नियुक्तीवरुन कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याने ठाणे शहराध्यक्ष पदावरून काढण्यात आले होते. त्याजागी जितेंद्र आव्हाडांनी नवीन शहराध्यक्षही नियुक्त केले होते. परंतु, अजित पवार गटाने परांजपे यांची पुन्हा शहराध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाट्यनंतर आनंद परंजपे यांची जितेंद्र आव्हाडांनी शहर अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती. मात्र, अजित पवारांनी परांजपे यांची पुन्हा शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांना प्रदेश प्रवक्ते पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. हकालपट्टी झाल्यानंतर 24 तासांच्या आत परांजपे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली असून कालच ठाण्यात आव्हाडांनी नियुक्ता केलेल्या नवीन शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी कार्यभार स्वीकारला होता. आता यामुळे आनंद परंजपे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागून राहील आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांचे एकेकाळचे खासमखास असणारे विरोधी पक्षनेते राहिलेले नजीब मुल्लाही अजित पवारांसोबत असल्याचं स्पष्ट झालं असून परांजपे यांच्या सोबत फोटोमध्ये तेही दिसत आहेत. त्यामुळे आव्हाड यांनी ठाण्यात हा आणखी एक मोठा धक्का समजला जातो आहे.