राजकारण

बावनकुळे म्हणाले 'औरंगजेबजी'; व्हिडीओ शेअर करत मिटकरींचा भाजपावर निशाणा

जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच वादात सापडले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रुर नसल्याचे म्हंटले होते. यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच वादात सापडले आहे. बावनकुळे यांनी औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हिडीओ ट्वीट करत निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, क्रूरकर्मा औरंग्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी ‘औरंगजेबजी’असे सन्मानाने म्हणतात, त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का?विशेषत: टिल्ल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का? असा सवाल अमोल मिटकरींनी केला आहे.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

आव्हाडांच्या विधानाचा निषेध करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड स्टंटबाज माणूस आहे, नौटंकी आहे. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. ते औरंगजेबजी यांना क्रूर मानत नाहीत. परंतु, यावेळी त्यांनी हिंदीत उच्चार करताना औरंगजेबचा उल्लेख ‘औरंगजेबजी’असा केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...