राजकारण

परमबीर सिंग हे भाजपचे एजंट होते का? अमोल मिटकरींचा फडणवीसांना सवाल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल नांदुरकर | अकोला : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत त्यांचे निलंबन रद्द केले आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. परमबीर सिंग हे भाजपचे एजंट होते का? असा सवाल त्यांनी केला आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदमध्ये बोलत होते.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा अधिकाऱ्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आणि आता म्हणतात माझ्याकडे पुरावा नाही. परमबीर सिंग हे भाजपचे एजंट होते का? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. आणि आता नव्याने राज्य सरकारने मुंबई पोलीसमध्ये त्यांची नियुक्ती केल्याने, परमबीर सिंग भाजपचे कार्यकर्ता म्हणून काम करत होते. आणि त्याचं बक्षिस म्हणून आता पुन्हा रुजू करून घेतलं. महाविकास आघाडी सरकार कोसळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांच्यावर खंडणी,अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते. परमबीर सिंग यांनी 2022 मध्ये निलंबनाला आव्हान दिले होते. यावर आज शिंदे-फडणवीस सरकारने परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप महाराष्ट्र सरकारने मागे घेतले आहेत. एवढेच नाही तर डिसेंबर २०२१ मध्ये दिलेला निलंबन आदेशही सरकारने रद्द केला आहे. तसेच, निलंबनाच्या काळात ते ऑन ड्युटी होते, असे समजावे, असेही म्हटले आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश