नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. नेहरूंच्या चुकांमुळे पीओके निर्माण झाल्याचे अमित शहा म्हणाले आहेत. यामुळे सभागृहातच मोठा गदारोळ झाला असून कॉंग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 वरील चर्चेदरम्यान अमित शहांनी हे विधान केले.
अमित शहा म्हणाले की, पंडित नेहरू पंतप्रधान असताना दोन मोठ्या चुका झाल्या, ज्याचे परिणाम काश्मीरला वर्षानुवर्षे भोगावे लागले. जेव्हा आमचे सैन्य जिंकत होते, तेव्हा पंजाबच्या भागात पोहोचताच युद्धविराम लागू करण्यात आला आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) चा जन्म झाला. जर युद्धविराम तीन दिवसांनी उशीर झाला असता, तर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आज भारताचा प्रदेश बनला असता. आमचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेण्यात आला, ही मोठी चूक आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. यावर कॉंग्रेसने तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला.
यावर अमित शहा म्हणाले की, जर तुम्हाला रागवायचा असेल तर माझ्यावर नाही तर नेहरूंवर रागावा. यानंतर काँग्रेस खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला. अमित शाह म्हणाले, पूर्वी जम्मूमध्ये 37 जागा होत्या, आता 43 आहेत. पूर्वी काश्मीरमध्ये 46 जागा होत्या, आता पीओकेमध्ये 47 आणि 24 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत कारण पीओके आमचा आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अभूतपूर्व बदल झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक व्यक्तीच्या उपचाराचा खर्च केंद्र सरकार 5 लाख रुपयांपर्यंत उचलते. आता 100 हून अधिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. व्हॅली शूटिंग सुरू आहे आणि 100 हून अधिक चित्रपटगृहांसाठी बँक कर्ज प्रस्ताव प्रक्रियेत आहे. 2024 मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक लोकसभेने मंजूर केले.