Raj Thackeray | Amit Shaha  Team Lokshahi
राजकारण

अमित शहा घेणार राज ठाकरेंची भेट; राज्याचे राजकीय समीकरण बदलणार

शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार

Published by : Sagar Pradhan

राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरु असताना दुसरीकडे गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. या उत्सवात राजकीय मंडळी मतभेद विसरून एकमेकांची भेट घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान, या दौऱ्यावर असताना शहा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ही भेट आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. जर मनसे आणि भाजपची युती झाली तर शिवसेनेला अडचणीची ठरू शकते.

अमित शहांचा असा असणार मुंबई दौरा

दोन वर्षां आधीच शहा हे मुंबई दौऱ्यावर येणार होते. मात्र, कोरोनामुळे शाह यांनी हा दौरा टाळला होता. आता 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 2017 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अमित शाह हे लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांनतर यंदा अमित शाह यंदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह हे आपल्या मुंबई दौऱ्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेणार आहेत. शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.

राज ठाकरेंसोबत करणार युतीची चर्चा ?

अमित ठाकरे हे 5 रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या काही दिवसात भाजप नेते राज ठाकरेंशी जवळीकता वाढवत आहे. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर मनसेने हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्यानंतर भाजप आणि मनसेत युतीची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज ठाकरे यांच्यासोबत भाजपची युती होण्याचे संकेत दिसत आहेत. अमित शहा राज ठाकरे यांची भेट घेणार असल्यामुळे भाजप- मनसे युती होणार असल्याची दाट शक्यता आहे.

भाजप- मनसे युतीने शिवसेनेची कोंडी, शिवतीर्थ होणार राजकारणाचे केंद्र

मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून सगळे प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबई शिवसेनाच किल्ला असला तरी, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना कमकुवत झाली आहे. मनसे आणि भाजपची युती झाल्यास शिवसेनेच्या विभाजली जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे मागतील काही महिन्यांपासून मातोश्रीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय, गणेश दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील शिवतीर्थावर हजेरी लावली. तर, मनसेच्या नेत्यांकडून शिवतीर्थ हेच आगामी राजकारणाचे केंद्र असणार असल्याचे सूचक वक्तव्य केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी भाजप-मनसे युती मोठा धक्का मानला जाणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result