राजकारण

बैठकीत पंचपक्वानाचा मेन्यू ठेवून...; अमेय खोपकरांची जोरदार टीका

'इंडिया' आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी मराठमोळ्या खाद्यपदार्थांचं आयोजन करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'इंडिया' आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी मराठमोळ्या खाद्यपदार्थांचं आयोजन करण्यात आले आहे. नाश्ता, लंच, डिनर, प्रत्येक ठिकाणी मराठमोळे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. यावरुन आता मनसेच्या अमेय खोपकर यांनी जोरदार टीका केली आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, राज्यात ३ आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे I.N.D.I.Aआघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत.शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही.

तसेच सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे. असे मिटकरी म्हणाले.

भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता

भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कुणाला मिळणार संधी?

दिवाळीत उटणे लावण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार; 'या' तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता