अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून ठार मारण्याची धमकी देणारं निनावी पत्र आलं आहे. किणीकर यांच्या अंबरनाथमधील कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने आज हे पत्र आलं. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे देखील त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आहेत. (Ambernath's Shiv Sena MLA Dr. Balaji Kinikar threatened to be shot dead)
यानंतर आज अंबरनाथमध्ये आमदार बालाजी किणीकर यांना अज्ञात इसमाने पत्र पाठवत गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत किणीकर यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केलाय. या पत्रामुळे अंबरनाथ शहरात खळबळ माजली आहे.
पत्रातील मजकूर काय आहे?
आमदार बालाजी तेरेको गोली मारनेका दिन आ गया हे,
हामारे अंबरनाथ के शिवसेना नेता को तकलीफ देता है
इसिलिए तुझे मारनेका हे बता इसलिये रहा हु जब में मारूंगा
वह दिन तय हे तब तक टू रोज डर डर के जिये
असा आशय या पत्रामध्ये लिहिण्यात आला आहे. या पत्रानंतर सायंकाळी शिवाजीनगर पोलिसांनी शिवाजी चौक येथील कार्यालयात पोलिसांनी धाव घेतली होती.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहेत. मंगळवारी देखील कॅबिनेटची बैठक झाली. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव आणण्याची शक्यता होती. त्यानुसार ते मांडण्यात आले. उद्धव ठाकरे या बैठकीसाठी मंत्रालयात हजर होते.