राजकारण

तारीख पे तारीखचा खेळ सुरू; सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर दानवेंना आठवला अनिल कपूरचा पिक्चर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सचिन बडे | मुंबई : न्यायालयाने सत्तासंघर्षावरील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय आज दिला. सतत अशा पद्धतीने तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली त्यावर दिली. सतत सुरू असलेल्या तारीख पे तारीख यावरुन अनिल कपूरच्या मेरी जंग या चित्रपटाची आठवण झाली, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली आहे.

सर्व परिस्थिती समोर आहे. पक्षांतर बंदीचा कायदा आहे. आयोग काय बोलतं हे समोर आहे. निदान फेब्रुवारीच्या १४ तारखेला तरी कोर्ट निर्णय देईल, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टात हा विषय सुरू असताना निवडणूक आयोग घाई का करतयं असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला.

वैधानिक दृष्ट्या हे सरकार वैध्य नाही. पक्षांतर कायदा ही तेच सांगतो. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी राजीनामा देऊन खुशाल दुसऱ्या पक्षात जावं, असेही दानवे म्हणाले आहेत. मंत्री मंडळाचा विस्तारही सुप्रीम कोर्टाच्या तारखेनुसारच सुरू आहे. त्यालाही तारीख पे तारीख मिळत असल्याची मिश्किल टीका दानवे यांनी केली.

छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तोपर्यंत शिवसेनेचे भविष्य उज्वल आहे. आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंच्या वक्तव्यांकडे पहावं, आम्हालाही तोंड उघडायला लावू नका. तसेच राणा पती पत्नी आमदार व खासदार यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे, असा टोला दानवे यांनी राणा यांना लगावला.

पंतप्रधानांना महापालिका निवडणुकीसाठी यावं लागतं हा शिवसेनेचा विजय आहे. एका महापालिकेच्या निवडणुकीला देशाच्या पंतप्रधांनाना यावे लागते. यावरून येथील नेतृत्व महाराष्ट्रात किती मोठं आहे हे सिद्ध होतं आणि हा शिवसेनेचा विजय आहे हे मानावं लागेल, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी पंतप्रधानांच्या मुंबईतील दौऱ्यावर दिली.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा