राजकारण

अजित पवारांनी वाटप केलेल्या वाहनांची चौकशी करावी; अंबादास दानवेंची मागणी

अजित पवार यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या चारचाकी गाडी देणार असल्याची घोषणा केली होती. यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या चारचाकी गाडी देणार असल्याची घोषणा केली होती. यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांना वाटप केलेल्या गाड्या कुठून आल्या याचा हिशोब समोर यायला हवा. अजित पवार यांनी वाटप केलेल्या वाहनांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासह राम मंदिराच्या आमंत्रणावरून आम्ही निमंत्रण मोहताज नाही, असेही दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि फिरण्यासाठी पक्षाकडून चारचाकी वाहनं दिलं जाणार आहे. याबाबतची घोषणा अजित पवार यांनी केली होती. तब्बल 40 हून अधिक गाड्या अजित पवार गटाकडून विकत घेण्यात येत आहेत. या गाड्या स्टेट ड्राईव्हसाठी पक्षाच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result