राजकारण

हे तर डरपोक सरकार; मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्दवर अंबादास दानवेंची टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशाराच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना दिला आहे. यावरुन राज्यात मोठा गदारोळ झाला होता. परंतु, यानंतर सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी दौरा रद्द केल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. डरपोक सरकार, असे म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

अंबादास दानवे म्हणाले, सीमा प्रश्नात काय होईल असं तर काही वाटत नाही. दोन्ही राज्यात भाजप सत्तेत आहे. आपले मंत्री दोन तारखा देऊन दौरा रद्द करताय हे डरपोक सरकार आहे. हे सीमा भागातील नागरिकांना न्याय देऊ शकणार नाहीत. बोम्मई व फडणवीस हे तू मारल्यासारख कर मी रडल्यासारख करतो असं सर्व सुरू आहे, असा घणाघात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

भाजप नेते प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त विधानावरही अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. छत्रपतींचा अवमान करण्याचा अजेंडाच भाजपचा आहे. महाराष्ट्रात लहान मुलगाही सांगेल महाराजांचा जन्म कुठे झाला, असे त्यांनी सांगितले.

तर, ठाकरे गट-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली होती. त्यातच उद्या यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र यावे ही बाळासाहेबांची इच्छा होती. जर त्यादृष्टीने पाऊल पडत असतील तर आनंद आहे, असे अंबादास दानवेंनी म्हंटले आहे.

‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय आशरची नियुक्ती केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत ते म्हणाले की, नीती आयोगाच्या धर्तीची स्थापना मनमोहन सिंह यांनी ज्या उद्देशान स्थापन केली. त्यात महाराष्ट्राच्या भविष्याचे व्हिजन असायला हवे. मात्र बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे असे काय व्हिजन आहे. आशिष शेलार यांनीच या व्यक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. शिंदेंचे अनेक मिटींगही तेच बघतात. यावरून कुठे नेऊन ठेवलाय. महाराष्ट्र असा प्रश्न उपस्थित होतो. फडणवीस यांची कूकरेजाची जवळकीता ही खूप काही सांगून जाते. फडणवीस काय आणि शिंदे काय यांना सर्व सामान्यांची काहीही पडलेली नाही, अशीही टीका अंबादास दानवेंनी शिंदे-फडवीसांवर केली आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने