मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर खंडणीचा आरोप झाला आहे. एका व्यावसायिकाकडं बारा लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. प्रकाश सुर्वेंचा जवळचा मानला जाणारा एक शाखाप्रमुख या व्यावसायिकाकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत शाखाप्रमुख 12 लाख रुपयांची मागणी करतोय. व्यावसायिक त्यांना तीन लाखांची ऑफर करताना दिसतोय. पण स्वतः सुर्वेंशी बोलून बारा लाखांमध्ये प्रकरणाचा निपटारा करण्याचा दावा तो शाखाप्रमुख करत आहे. सत्ताधारी आमदारांशी संबंधित कार्यकर्ते खुलेआम खंडणी मागत असल्यानं खळबळ माजली आहे.
दहिसर येथील जीवघेण्या खदानीत भरणीचे काम करणाऱ्या एका व्यावसायिकाकडे मागाठाणेतील शिवसेनेचे म्हणजेच शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या शाखाप्रमुखाने १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा व्हिडीओ शनिवारी समोर आला. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी व्यावसायिक साहेबराव बारकू पवार यांचा जबाब नोंदवून घेतला असला तरी पुढे मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.