राजकारण

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना धक्का?

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Published by : Dhanshree Shintre

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी धीरज शर्मा आणि सोनिया दुहान हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यात या दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती. लवकरच या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा अजित पवार यांच्या गटात पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याची चर्चा होती. आता मुंबईतील गरवारे क्लब येथे सोमवारी पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोनिया दुहान या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत होत्या. पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या. सोनिया दुहान यांनी हॉटेलमध्ये जात अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते.

धीरज शर्मा यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. यामध्ये, मी धीरज शर्मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून देण्यात आलेल्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे, अशी पोस्ट शर्मा यांनी केली आहे. त्यासोबतच धीरज शर्मा यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे