राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं निवडणुकीची मतमोजणी रखडली आहे. मतदानाच्या वेळी जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी मतपत्रिका दाखवल्यानं त्यांची मतं बाद करावीत, अशी मागणी भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली. अजून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. काही वेळातच निर्णय येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Ajit Pawar's Pune tour canceled immediately)
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उद्याचा पुणे दौरा तातडीनं रद्द करण्यात आलेला आहे. राज्यसभा निवडणुकी संदर्भात निर्माण झालेल्या पेचामुळे सर्व नेते मुंबईतच थांबणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे पवारांचा उद्याचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे. कुणालाही मुंबई न सोडण्याचे पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या मुंबईतच थांबणार आहेत.