मुंबई : खासदार सुनिल तटकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आज झाला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवारांसह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अजित पवारांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली आहे. घरातील सदस्यांपेक्षा ड्रायव्हरला जास्त माहिती असते की कोणत्या हॉटेल रूममध्ये शिरला, अशी कोपरखळी अजित पवारांनी सर्वच राजकीय नेत्यांना मारली.
अजित पवार म्हणाले की, आपल्या घरातील व्यक्तीला जितकी माहिती नसते. तितकी आपली वैयक्तिक माहिती ड्रायव्हरला जास्त असते. कुठे गेला, किती वाजता कुठे थांबला. किती वेळ थांबला. कोणती रूम बुक केली. दुसऱ्या रूममध्ये गेला का? याची सगळी माहिती ड्रायव्हरला जास्त असते. दिल्लीत असले तरी रायगडमध्ये काय चाललय? रोह्यात काय चाललय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काय चाललंय याची सर्व माहिती त्यांना असते.
ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार आलं. त्यावेळी त्यांच्या मनात आलं की जर राज्यांत असतो तर मंत्री झालो असतो. मात्र, मुलांना दिल्लीत पाठवावं लागलं असतं. परंतु, ते शक्य नव्हतं. शिवाय भास्कर जाधव यांच्या मदतीशिवाय देखील हे शक्य नव्हतं, असेही अजित पवारांनी म्हंटले आहे.