बारामती : अजित पवारांचे सुपुत्र जय पवारांनी बारामतीतील राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला भेट दिली. या भेटीनंतर जय पवार राजकारणात येण्याची चर्चा रंगली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनीही जय पवारांना राजकारणात सक्रीय होण्याची मागणी केली. त्यावर त्यांनी दादांनी सिग्नल दिल्यानंतर मी तयार असल्याची सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी मी तुमच्या सगळ्यांचे कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे, असे जय पवार म्हणाले. लवकरच जय पवार हे राजकारणात सक्रिय व्हावे,, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तुम्ही दादांशी बोलून घ्या त्यांनी मला सिग्नल दिला की मी लगेच तयार आहे, असे देखील जय पवार म्हणाले आहेत. यामुळे जय पवार हे राजकारणात सक्रिय होणार हे मात्र नक्की झाले आहे.