राजकारण

वय 82-83 झालंय, तुम्ही थांबणार आहात की नाही; अजित पवारांचा शरद पवारांना रिटायरमेंटचा सल्ला

अजित पवारांनी शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर उपस्थित केले सवाल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, आता तुम्ही थांबणार आहात की नाही, तुम्ही आशीर्वाद द्याना. तुम्ही शतायुषी व्हावं, असं म्हणत अजित पवार यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर थेट सवाल उपस्थित केले आहेत. आम्ही राज्य चालवू शकत नाही का? आज राज्य चालवू शकतात त्यात माझे नाव घेतले जाते का नाही, असेही त्यांनी विचारले आहे.

अजित पवार म्हणाले की, साहेब आमचे श्रद्धास्थान आहे. ही वेळ आपल्यावर का आली? प्रत्येकाच काळ येतो. 1978 पासून देशाने पवारांना साथ दिली. मी आज जे काही आहे, पवार साहेबांमुळे आहे. साहेबांच्या छत्रछायेखाली तयार झालोयं. लोकांच्या विकासासाठी आम्ही निर्णय घेतलायं.

2 मे ला शरद पवार यांनी राजीनामा दिला. तेव्हा मी कमिटी करतो सर्व प्रमुख बसा आणि सुप्रियाला अध्यक्ष करा आम्ही तयार झालो. त्यानंतर मी राजीनामा मागे घेतो बोललं, मग दिलाच कशाला?

मी सुप्रियाशी बोलो, ते हॅप्पी आहे त्यांचा हट्ट आहे. असला कसला हट्ट. 83 वय झाले आहे कुठेतरी थांबले पाहिजे. पुढच्या पिढीला जबाबदारी दिली पाहिजे. एखादा माणूस रिटायर का होत नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना रिटायर होण्याचा सल्ला दिला.

२०२४ ला आपल्याला राष्ट्रवादीच्या ७४ चा आकडा आपल्याला मोडून काढायचा आहे, महाराष्ट्र पिंजून काढू. अजूनही विनंती आहे की आशीर्वाद द्या. दिलीप वळसे पाटील यांनी काय चूक केली. त्यांनी मतदार संघ बांधावा लागेल. मला पण बोलतां येत बोलावे लागेल. वरिष्ठ म्हणतात की निवडूनच कसे येतात ते पाहतो. ज्यांनी तुम्हाला साथ दिली. त्यांच्यासाठी ही भाषा. केंद्र सरकार राज्य सरकार एक मताचे असले तर केंद्राचा निधी येतो कामे होतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश