खते आणि बोगस बियाणांच्या मुद्यांवरुन सभागृहात विरोधक आक्रमक झाले आहेत. बोगस बीयाणांच्या संदर्भात किती जणांवर कारवाई केली याची माहिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली.
यावर आता अजित पवार यांनी घोषणा केली आहे. अजित पवार म्हणाले की, बोगस खते आणि बियाणे विकणार्यांवर नियंत्रण आणण्याचे काम राज्य सरकार करत आहे. 210 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय मागील कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषीमंत्री, महसूलमंत्री, ग्रामविकासमंत्री, पाणीपुरवठामंत्री अशी एक समिती करण्यात आली आहे.
तसेच पुढे अजित पवार म्हणाले की, बोगस खते आणि बियाणे विकणार्यांवर नियंत्रण आणण्याचे काम राज्य सरकार करत आहे. केंद्र सरकारने यावर्षी खतांच्या किमती मर्यादित राहाव्यात यासाठी एक लाख 30 हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.