राजकारण

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार फडणवीसांच्या भेटीला, खातेवाटप होणार?

अजित पवारांच्या शपथविधीनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अजित पवारांच्या शपथविधीनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी त्यांच्या समर्थक मंत्र्यांची व खासदार यांची पाऊण तास महत्वाची बैठक पार पडली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

अजित पवार यांची समर्थक मंत्र्यांची व खासदार यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची पुढील भूमिकास विशेषत: खात्यांबाबत चर्चा झाली आहे. त्याचप्रमाणे रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांना अपात्रतेविषयी कारवाईसाठी पत्र पाठवलं त्यावर देखील चर्चा झाल्याचे समजते. यानुसार किती आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत याबाबत आढावा घेतला गेला. तसेच, आजच्या बैठकीत आपल्या सोबत असलेल्या आमदारांना अजितदादा आणि नेते दूरध्वनीवरून संवाद साधत आहेत.

राष्ट्रवादीच्या विधानसभा प्रतोद पदी अनिल पाटील आहेत. तसेच गटनेते हे अजित पवारच असतील हे बैठकीत सांगण्यात येत आहे. प्रतोद जे आदेश देतील तेच पाळावेत अशा सूचना देखील या आमदारांना करण्यात आले आहेत. तळ्यात मळ्यात असणाऱ्या आमदारांना घाबरू नका, आपण पक्षातच आहोत, असे अजित पवारांबरोबर असलेल्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

तर बैठकीनंतर अजित पवार हे छगन भुजबळ, प्रफुल पटेल आणि तटकरे सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यामुळे फडणवीस-पवारांच्या भेटीमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीमध्ये खाते वाटपाबद्दल संभाव्य चर्चा होऊ शकते.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result