राजकारण

Maharashtra Politics : अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) देशभरात आज मतदान सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांची भेट घेतेली आहे. यामुळे राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएकडून द्रौपदी मुर्मू व युपीएकडून यशवंत सिन्हा हे आमनेसामने आहेत. या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून भाजपच्या नेत्यांनी मुर्मू याच जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केले आहे. तसेच, या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी मुर्मंना मतदान करणार असल्याता दावा भाजपने केला आहे. अशातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु होत आहेत. परंतु, ही भेट केवळ नगर विकास विभागाच्या कामांना स्थगिती दिल्याने घेतली असल्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी सांगितले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार काळात अर्थ विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. त्यातील एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. शिंदे सरकारचा हा निर्णय अजित पवार यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Latur : लातूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज लातूर बंदची हाक

Bharat Gogawale : आमदार भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट | Marathi News

Sangli : सांगली जिल्ह्यात पावसाचे थैमान; पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर

Navra Maza Navsacha 2 : "नवरा माझा नवसाचा २"ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद