राजकारण

दोन जणांचीच सध्या कॅबिनेट, हे महाराष्ट्राचे मालक झालेत; पवारांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र

Ajit Pawar यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर केली कडाडून टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सध्या दोन जणांचीच कॅबिनेट (Cabinet) दिसत आहे. सगळा भार या दोघांच्या खांद्यावर असून हे दोघे जण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले की, अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारने आता पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठाकरे सरकारचा सरपंच निवडीचा निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, पुन्हा थेट जनतेने सरपंच निवड आता या सरकारने केली आहे. सरपंच एक विचाराचा आणि बॉडी दुसऱ्या विचाराची असं होत असते. नगरसेवक आणि नगराध्यक्ष पण तशीच स्थिती होते. यामुळे हा निर्णय लोकशाही ला मारक असा निर्णय या दोघांनी घेतला आहे

मी गॅस वरचा टॅक्स कमी केला होता. तेव्हा हे लोकं आमच्याकडे ५० टक्के कर माफ मागणी करत होते. मग आता का नाही केली. आज केली असती तर पेट्रोल १७ रुपये स्वस्त झाले असते, असा दावा पवारांनी केला आहे. निर्णय घेताना सरकार पळवाट काढत आहे. पुन्हा केंद्र सरकार दर वाढवेल. यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यामागे नागरिकांना फार फायदा होणार नाही. सरकार बद्दल्यानंतर आम्ही काही करतोय हा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीकाही त्यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

अनेक वेळा पुर येतो. ढगफुटी होत असते. त्यावेळी मदत खात्याला सचिव महत्त्वाचा असतो. तसेच, आपती व्यवस्थापनाला संचालकच नाही, हे या सरकारचे अपयश आहे, असाही निशाणा अजित पवारांनी साधला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले की, सध्या दोन जणांचीच कॅबिनेट दिसत आहे. सगळा भार या दोघांच्या खांद्यावर आहे. हे दोघे जण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. १६५ आमदारांचे पाठबळ आहे. पण, कुठे घोडं पेंड खात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करायला का घाबरत आहे, असे टीकास्त्र त्यांनी शिंदे सरकारवर सोडले. अडीच वर्षात आम्ही कधीही माईक खेचला नाही, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा