मुंबई : पर्यटन विभागाने काल जाहिरात काढली. देखो आपला महाराष्ट्र! सरकारला मराठी भाषेची अडचण झाली आहे का? आता यांनाच पाहण्याची वेळ आलेली आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत ते बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत आपल्यामध्ये दुरावा निर्माण होऊ देऊ नका, असेही त्यांनी म्हंटले आहेत.
ही मविआची ही तिसरी सभा आहे. मुंबई राजधानी असली तरी ही मुंबई आपल्याला सहजासहजी मिळालेली नाही. मुंबईत मराठी टिकवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवसेनेमुळे मुंबई टिकली हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. आपण चांगलं सरकार चालवण्याचे काम मविआ म्हणून आम्ही केलं. आर्थिक स्थिती थांबणार नाही याची काळजी घेतली. हेच लोकांच्या डोळ्यात खूपू लागलं. आणि फोडण्याचं काम केलं, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.
दहा महिने झाले सरकार निवडणुका घ्यायला का घाबरतंय? पालिका निवडणुका का घेतल्या जात नाही आहेत? निवडणुका घेतल्या तर जनता काय निर्णय देईल याचा विश्वास त्यांना नाहीये. कटाक्षाने दुर्लक्ष करण्याचे काम सुरु आहे. हे सरकार फक्त सारख्या जाहिरातबाजी करत आहेत. त्यांचे फोटो कोण बघत नाही. पण बळजबरीने बघावे लागतात. विश्वासघात करून सरकार आलेलं आहे. गद्दारी करून हे सरकार आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुसंक सरकार म्हटलं. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? यामुळे आपली पण मान खाली जाते. पण, मुख्यमंत्र्यांना काहीच वाटतं नाही, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
सहा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा चुकलेले पाहिले आहेत.मध्यतंरी देशाचं पंतप्रधान द्रौपर्दी मुर्मु असे म्हंटले. पंतप्रधान कोण हेही माहिती नाही. उद्योगपतींसमोर म्हणाले, आम्हीं मुंबईत साडेतीनशे पन्नास किमी. मेट्रो लाईन टाकली. कशाला साडेतीनशे पन्नास म्हणतात? जमत नसेल तर नोट काढून वाचा, असा टोलाही अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.
मध्यतंरी 150 बैठका घेणारा नवा हिंदकेसरी महाराष्ट्राला मिळाला आहे. ठाकरे सराकार पाडण्याकरीता किती दिवस पाताळयंत्री कारावाया सुरु होत्या. हे समोर आले आहे, असा निशाणाही त्यांनी साधला आहे. सत्ता येतं, सत्ता जातं, सत्तेसाठी आम्ही हापापले नाही. पण, जनतेच्या विश्वासला तडा जाता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. टिल्ली-पिल्ली लोकही काही पण बोलत आहे. राजू शेट्टींनी तर सांगितले बदल्यांचे दर ठरले आहेत. पण, विरोधक-सत्ताधारी यांच्याशी कोणाताही संबंध नसणारे राजू शेट्टींसारखे ही बोलायला लागले आहे. असे भ्रष्टाचारी सरकार आहे. हे महापालिकेला परवडणारं नाही.
तर, पर्यटन विभागाने काल जाहिरात काढली. देखो आपला महाराष्ट्र! सरकारला मराठी भाषेची अडचण झाली आहे का? आता यांनाच पाहण्याची वेळ आलेली आहे, असेही अजित पवारांनी म्हणाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्यामध्ये दुरावा निर्माण होऊ देऊ नका, असेही त्यांनी म्हंटले आहेत.