Ajit Pawar Team Lokshahi
राजकारण

अजित पवारांच महाविकास आघाडीबाबत मोठं विधान

Published by : Shubham Tate

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. शिवसेनेच्या आमदारांसह शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. शिवसेनेचे निम्म्याहून अधिक मंत्री शिंदे गटात गेले आहेत. तर या गटाकडे आमदारांचा ओढा कायम आहे. अनेक अपक्षांचाही शिंदेंना पाठिंबा आहे. या सगळ्यांसह आता शिंदे राज्यपालांना संख्याबळाबद्दलचं पत्र देणार आहेत. याचदरम्यान जिल्हा आणि तालुकाप्रमुखांशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ऑनलाईन संवाद साधला असता, यावेळी ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. (ajit pawar cm uddhav thackeray political crisis on Eknath Shinde)

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांशी आज संध्याकाळी 6:30 वाजता चर्चां करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच विधीमंडळाबाबत अध्यक्ष निर्णय घेतील. तसेच आम्ही कोणत्याही परिस्थीतीत उद्धव ठाकरे यांच्याशी कायम सोबत आहोत. अस ही मत त्यांनी मांडले. राष्ट्रवादीचे सगळे नेते इथं आहेत, आणि आमच्याकडे बहुमत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, अडीच वर्षातील ज्या समस्या आल्या. त्या हाताळण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांना सांभाळताना आपले आमदार मुख्यमंत्र्यांनी गमावले असं वाटतं का? यावर बोलताना ते म्हणाले की, अजिबात नाही.

दीड वर्ष मुख्यमंत्री मातोश्रीवरून काम करत होते. आताही काम करत आहेत. तुम्हीच बातमी केलीय ना? असा ही सवाल यावेळी पवार यांनी केला.

शरद पवार आमचे नेते आहेत. ते आमचे दैवत आहेत. त्यांनी एकदा प्रतिक्रिया दिलिय्ानतंर त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही ठाकरे सरकारच्या पाठी राहून मविआ टिकवायची आहे. तसेच पवारांनी सांगितलं मी सांगितलं. जयंत पाटील यांनी सांगितलं. आमची उद्धव ठाकरेंना साथ आहे. कितीवेळा सांगू. लिहून देऊ का. अस म्हणत अजित पवार भडकले.

साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

जालन्यात मराठा - ओबीसी समाजाचं उपोषण; उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी समाजातील लोकांची गर्दी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज कोकणात

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित