राजकारण

सीमाप्रश्नावर सोमवारी सरकारला ठराव घ्यायला भाग पाडू : अजित पवार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : कर्नाटक अधिवेशनात सीमाप्रश्न विरोधी ठराव संमत करण्यात आला आहे. यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. काळ्या पट्टया बांधून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर निषेध केला आहे. तर, सोमवारी सीमा प्रश्नावर सरकारला ठराव घ्यायला भाग पाडू, असे विरोधी पक्ष अजित पवार यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत, असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत, त्यामुळे तो ठराव घ्या, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु, आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही. मात्र, सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना महाविकास आघाडीचे आमदार श्रद्धांजली वाहत आहे आणि दुसरीकडे शिंदेसरकार कामकाज करत आहेत. मुळात सरकारने विधानसभा सदस्य म्हणून आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवे होते, असे मत व्यक्त करत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, विधानभवनाच्या पायर्‍यांवर प्रती सभागृह भरवून महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपले विचार मांडले व महापुरुषांचा अपमान करणार्‍या सरकारचा निषेध केला.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल