राजकारण

मराठा आंदोलक आक्रमक! राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांचं घर जाळलं

बीडमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलक आक्रमक झाले असून परिस्थिती चिघळत चालली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बीड : राज्यभरात मराठा समाज आरक्षमाच्या मागणसाठी आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या राहत्या बंगल्याला आग लावली आहे. तर, याआधी राष्ट्रवादी कार्यालय आणि प्रकाश सोळंके यांचेही घर जाळण्यात आले होते. यामुळे एकूणच बीडमधील परिस्थिती चिघळल्याचे समोर येत आहे.

बीडमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलक आक्रमक झाले असून परिस्थिती चिघळत चालली आहे. शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे राहते घर आंदोलकांनी जाळले आहे. एवढेच नव्हेतर बीडमधील राष्ट्रवादी भवन पेटवण्यात आलं आहे. शरद पवार गटाचं कार्यालय मराठा आंदोलकांनी पेटवलं आहे.

दरम्यान, बीडच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याही घरावर सकाळी आंदोलकांनी दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. तर, गाड्याही पेटवल्याचे समोर आले होते.

Diwali 2024: लक्ष्मी पूजनाला झेंडूची फुलं का वापरतात?

महाविकास आघाडीच्या प्रचाराला 6 नोव्हेंबरपासून होणार सुरुवात

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी म्हणाल्या...

झेंडूचं फुल: आरोग्यासाठी फायदेशीर आणि लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक; जाणून घ्या

LPG Price Hike: ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका! गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; जाणून घ्या दर