Ramdas Kadam Team Lokshahi
राजकारण

सत्तारांनंतर शिंदे गटातील आणखी एका नेत्याची टीका करताना जीभ घसरली

राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंनी भूमिका होती. त्यामुळे भविष्यात देखील भाजपा-शिवसेना युती कायम राहील असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला

Published by : Sagar Pradhan

निसार शेख|चिपळूण: राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यापासून या सरकारमधील मंत्री आणि नेते वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत आहे. कालच राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच चर्चेत आले आहे. हे प्रकरण शांत होत नाही तर आता शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी माजी मंत्री अनिल परब आणि सुभाष देसाई यांच्यावर टीका करताना शिवीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता सत्तारांनंतर कदमांचा शिवसेना(ठाकरे गट) यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे. चिपळूणमध्ये बोलत असताना रामदास कदम यांनी हे वादग्रस्त भाष्य केले आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

शिवसेना-भाजपा युती हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत संघर्ष केला त्यांच्याबरोबरच उद्धव ठाकरेंनी आघाडी केली. गुवाहाटीला गेलेले सेनेचे सर्व आमदार मी परत आणत होतो पण राष्ट्रवादीची साथ सोडा एवढीच मागणी या आमदारांनी केली होती. पण पक्ष फुटला तरी चालेल पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंनी भूमिका होती. त्यामुळे भविष्यात देखील भाजपा-शिवसेना युती कायम राहील असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.

रामदास कदम पुढे म्हणाले की, अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले. त्यांना लवकर अटक करायला हवी. दापोली-मंडणगडची नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. ही नगरपालिका त्यांनी राष्ट्रवादीच्या घशात घातली. माझा मुलगा योगेश कदमला परब यांनी खूप त्रास दिला असल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनादेखील आपल्या भोवती असेच XXX लागतात अशा अर्वाच्य भाषेत कदम यांनी टीका केली. कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावरही टीका केली. देसाई हे उद्धव यांचे कान चावतात, त्यांचे कान भरत असल्याचे कदम यांनी म्हटले.

खोक्यांची मुद्द्यावरून शिंदे गटाला टार्गेट केले जात असतानाच शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी विरोधकांना यावर सणसणीत उत्तर दिल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोके देतात पण ते जनतेच्या विकासकामांसाठी देतात आणि खोक्यांवरून आरोप करणाऱ्यांनी एक तर बाप दाखवावा नाही तर श्राद्ध घालावे असे उलट आव्हानच रामदास कदम यांनी विरोधकांना दिले आहे.

IPL Mega Auction 2025 Live: "या" 18 वर्षीय खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सचा हट्ट कायम, कोण आहे हा खेळाडू

Nana Patole : मी राजीनामा दिला नाही | Maharashtra Vidhansabha Election

Mahayuti Oath Ceremony On Wankhede Stadium | नव्या सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर

Latest Marathi News Updates live: भास्कर जाधव यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड

Sanjay Raut Vs Ajit Pawar | EVM ला दोष देणं म्हणजे... संजय राऊत यांच्या टीकेला अजित पवार यांचा उत्तर