मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले. त्या ठिकाणी किरीट सोमय्या जाणार आहेत. याआधी माजी मंत्री अनिल परब यांनी आपली भूमिका मांडली. किरीट सोमय्यांनी मराठी माणसाला या ठिकाणी राहू द्यायचं नाही हे धोरण ठरवत बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे. किरीट सोमय्या इथे येऊ द्या, आम्ही त्याचं स्वागत आमच्या पद्धतीने करू, कारण मराठी माणसाच्या हिताच्या आड कुणी आलं तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशाराच अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना दिला आहे.
कालपासून एक बातमी सुरु आहे. अनिल परब यांचं अनधिकृत ऑफिस तोडलं गेलं आहे. 1960 पासून या इमारती म्हाडाच्या झाल्या आहेत. या इमारतीचा मी राहिसावी आहे. आज मी माजी मंत्री म्हणून बोलत नाही तर इथला एक रहिवासी म्हणून बोलत आहे. मी आमदार झालो तेव्हा या इमारती म्हाडाच्या मालकीच्या राहिल्या नाहीत. येथील लोकांनी मला सांगितलं की तुमचा जनसंपर्क कार्यालय इथेच राहू द्या, अशी नागरिकांची मागणी होती. या जागेबदद्ल मी मंत्री झाल्यावर किरीट सोमैय्या यांनी तक्रार केली. म्हाडाला मी उत्तर दिलं की मी या जागेचा मालक नाही. म्हाडानेही त्यांची नोटीस मागे घेतली. या इमारतेतील रहिवासी हायकोर्टामध्ये गेले. इमारतीला नियमित करण्याची मागणी केली. पण सोमय्या यांनी करू नका, अशी मागणी केली.
अनिल परब याचं कार्यालय तोडलं, अशी दहशत निर्माण करता येईल. किरीट सोमय्यांना भाजपचा पाठिंबा आहे का? नारायण राणे यांचं घर तोडण्याचं आदेश कोर्टाने दिला आहे, किरीट तिथे जाणार आहेत का? किरीट कोण आहे? अधिकारी आहे? मी म्हाडाला पत्र लिहिलं आहे की येथील लोकांनी अतिरिक्त जागा तोडली आहे. म्हाडाने अधिकारी नेमला आहे का, असे प्रश्न अनिल परब यांनी विचारले आहेत.
56 वसाहती आहेत. त्यांचा विषय मी घेणार आणि जे नुकसान होणार त्याला जबाबदार किरीट सोमय्या असतील. मराठी माणसाला उध्वस्त करण्याचा डाव त्यांचा आहे. हिम्मत असेल तर किरीट सोमय्या यांनी येथे यावं आम्ही आमच्या पध्दतीने स्वागत करू. याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर दोन वर्ष आरोप होत होते मी बोललो नाही कारण मी त्यांना गिनतीत धरत नाही. पण आज सगळे लोकं माझ्यासोबत आहेत.
पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू. गरिबांच्या पोटावर पाय ते देणार आहेत का? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भेटणार आहे. शिवसेनेचे स्वागत काय असणार आहे हे आम्ही त्यांना दाखवू, असा इशाराच अनिल परबांनी सोमय्यांना दिला आहे.