राजकारण

संजय राऊतांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आदित्य ठाकरे यांची निष्ठायात्रा आज दीपक केसरकर यांच्या होपपीचवर सावंतवाडीत दाखल

Published by : Team Lokshahi

सिंधुदुर्ग : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) रविवारी अटक करण्यात आली. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून केंद्र सरकार हे ईडीची दहशत दाखवत असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांची निष्ठायात्रा आज दीपक केसरकर यांच्या होपपीचवर सावंतवाडीत दाखल झाली आहे. त्यांचे मोठ्या उत्साहात शिवसैनिकांनी स्वागत केले. यावेळी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. हे महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचं कटकारस्थान आहे आणि हे सर्व जगजाहीर आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

तर, आमदारकीचा राजीनामा द्या, दुसरे म्हणजे परच येयाच असेल तर आमचे दरवाजे उघडे असतील,असे दोन पर्याय आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांची वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. केल्यानंतर त्यांना जामिन मिळतो की कोठडी याकडे लक्ष लागून आहे. तर, व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊत दाखल झाला. यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Mns Candidate List: मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची घोषणा

Mns Candidate List: मोठी बातमी! मनसेची 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

MVA Seat Formula ; विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर! हा असेल फॉर्म्युला

Bhaskar Jadhav on Shivsena UBT Candidate List: भास्कर जाधवांना उमेदवारी जाहीर, काय म्हणाले जाधव

Sushama Andhare | शिवसेना उबाटाची यादी जाहीर, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया