राजकारण

बावनकुळेंच्या जागा वाटपावर शिवसेना नाराज; आदित्य ठाकरे म्हणाले, सर्कस सुरु

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजपाच्या निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे शिंदे गटाला केवळ विधानसभेच्या केवळ 48 जागाच मिळणार असल्याचं दिसून येत आहे. यामुळे शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व सर्कस सुरु असल्याची टीका त्यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ही एक सर्कस आहे. सगळं हास्यास्पद सुरू आहे. गद्दारांना कुठेही सफलता मिळणार नाही. ३३ देशातील लोक त्यांच्यावर हसत होती, असे टीकास्त्र त्यांनी शिंदे गटावर सोडले आहे. सरकार प्रत्येक ठिकाणी कमी पडतंय. अवकाळीग्रस्त भागात कोणालाही मदत मिळाली नाही. राज्यात पूर्ण वेळ पर्यावरण मंत्री नाही आहे. केंद्रीय मंत्र्यांना वायू प्रदूषणावर पत्र लिहले आहे, असेही त्यांनी म्हंटले.

निवृत्त न्यायमूर्तींवर गंभीर आरोप विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी केला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी न्यायव्यवस्था स्वतःच्या हातात घ्यायचा प्रकार सुरु आहेत. जिथे सत्तेविरोधात बोलण्याऱ्यांविरुध्द अशा कारवाई केली जात आहे. देशात लोकशाही संपत चालली आहे की संपलेली आहे त्यावर चर्चा होऊ शकते. देशात लोकशाही नाही हे आता मानूनच चाललाय पहिजे. लोकशाही आणि संविधानांसाठी लढण्याची आता गरज आहे, असेही यांनी म्हंटले आहे.

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये