राज्यात सध्या राजकीय अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. त्यातच वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला या प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या प्रकल्पावरून जोरदार आरोप- प्रत्यारोप राजकारणात होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे- फडणवीस सरकार वर जोरदार प्रहार केला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरेंनीं एक महत्वाचा विषय माध्यमांसमोर मांडला. ते म्हणाले की, वर्सोवा - वांद्रे सी- लिंकचे काम या खोके सरकारने वेगळ्या कंत्राटदाराला दिला आहे. विशेष म्हणजे या कामाची जाहिरात चैन्नईत होत आहे. काम मुंबईतील आणि कामाची जाहिरात चैन्नईत का? आपल्याकडे इंजिनियर कमी आहेत का? राज्यात या कामाच्या जाहिराती नाही, भूमिपुत्रांना कधी संधी मिळणार. असा सवाल त्यांनी यावेळी या कामावरून शिंदे सरकारला केला. येथे महाराष्ट्रात भूमिपुत्रांना काम नाही, आणि हे बाहेर मुलाखत घेता आहे. या सी- लिंकच्या कामासाठी बाहेरील ४० जणांना बेकायदशीर नोकरी या ठिकाणी देण्यात आली आहे. असा गंभीर करत त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत लपून १२, १३ वेळा गेले - आदित्य ठाकरे
माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा यावेळी टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री दिल्लीत स्वतःसाठी गेले की, महाराष्ट्रसाठी गेले माहित नाही. त्यांची ही आठवी दिल्लीवारी आहे. तसे ते, लपून- छपून १२, १३ वेळा दिल्लीत गेले. मुख्यमंत्री नुसते दिल्ली वारी करता एकीकडे राज्यतील प्रकल्प बाहेर जाता आहे. महाविकास आघाडीच्या काळातील किती भूखंडांना या खोके सरकारने स्थगिती आणली. किती प्रकल्पना स्थगिती दिली उत्तर द्या? असा सवाल त्यांनी शिंदेंना केला. पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्रीच सर्व लक्ष आमच्यावर, आम्हाला राजकारणातुन बाहेर काढण्यासाठी आहे, राज्यात काय चाललं याकडे त्यांनी लक्ष द्यावे. मुंबईतील कामासाठी महाराष्ट्रात मुलाखत का नाही? मुख्यमंत्र्यांनी यांचे उत्तर द्यावे. ते ७ वर्षांपासून त्या विभागाचे मंत्री आहे आणि त्यांचा विभागावर त्यांचे लक्ष का नाही? असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले.