राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यातील दिवसांदिवस वाद वाढतच चालला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा पार पडली. त्यासभेत ठाकरेंसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. याच ठाकरेंच्या सभेला उत्तर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच खेडमध्ये सभा होत आहे. त्याच सभेवरून आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेवर टीका केली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली. परंतु, ठाकरेंच्या सभेवर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. त्यांनी त्यावेळी आरोप केला होता की, ठाकरेंच्या सभेला जमलेली गर्दी आणलेली होती. मात्र, आज मुख्यमंत्र्यांच्या सभेला अफाट गर्दी होईल असा देखील दावा शिवसेना नेते करत आहेत. त्यावरच बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, खूप मोठी सभा होणार आहे अगदी चंद्रावर देखील लोक मावणार नाही. असा टोमणा त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना मारला आहे.
पुढे त्यांनी संजय गायकवाड यांनी संपावर केलेल्या विधानावर देखील टीका केली. ते म्हणाले की, माझा प्रश्न भाजपाला राहील की ते अश्या लोकांच्या पाठीशी उभे राहणार का? अशा गद्दार लोकांच्या पाठीशी राहणार का? आता तुम्हाला कळत का असे लोक आमच्यासोबत का नाही राहिले का पळून गेले. अशी लोक पक्षात नसलेलेच बरे वाईट येच वाटत की आम्ही यांना आमदार केलं आणि हे लोक असे वागतात. ज्या शब्दात ते बोले ते खूप घाणेरडं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना गद्दार गॅंगमधून बाहेर काढलं पाहिजे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.