मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ४०० किमी सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांची घोषणा केली होती. मात्र, ही कामं अद्यापही सुरू झाली नसून या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाचा विषय आपल्याला पाहायला मिळत आहे. विकासाच्या नावाखाली हे सरकार घोटाळे करत आहेत. रस्त्याचा घोटाळ्याचा विषय मी काढला होता. रस्ते मेपर्यंत पूर्ण होतील की नाही ही साशंकता आहे. कुठलेही लोकप्रतिनिधी नसताना कॉन्ट्रॅक्ट मिळतात. यामुळे 48 टक्के जास्त घोटाळे होत आहेत. एप्रिल संपत आलं तरी कामं कुठेही सुरु झालेली नाही आहेत. कामं सुरु कधी होणार आणि कुठे सुरु झालेली आहेत, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
रस्त्याची कामं सुरु झाली आहेत असं वाटत नाही आहेत. विधानसेभेचे अध्यक्ष यांचे बंधू नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पत्र लिहिलं आहे. वॉर्डमध्ये कामं सुरु झालेली नाहीत, असे नार्वेकर यांनी पत्रांत लिहिलं आहे. गद्दार गँग सोडल्यास जी कामं ठरवली होती ती सुरु झालेली नाही. कंपनीच्या बैठकीला अधिकारी गेलेच नाहीत. कारणे दाखवा नोटीस दाखवल्यानंतरही कामं सुरु झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
माझ्या मतदार संघातील पाहणी करताना एक गोष्ट आढळली आहे. गेली दोन आठवडे सर्व कामं बंद आहेत. सगळ्या क्रशर यांना नोटीस पाठवून कामं बंद ठेवण्यात आली आहे. इतर शहरातील कामंही ठप्प पडली आहेत. एप्रिल संपत आला आहे. यामुळे 31 मेच्या पुढे हे काम जाणार आहे. पावसाळ्याच्या आधी हे काम होऊ शकत नाही. रस्त्यात वापरण्यात येणाऱ्या खडी सध्या जास्त किंमती आपल्याला मिळत आहे. आपल्या देशात जीएसटी आहे. पण, इथे वेगळं टॅक्स आहेत का? महाराष्ट्र सरकारला समाज द्या अशी विनंती मी नितीन गडकरी यांना करणार आहे. रस्ते कामे ठप्प झाल्याने लोकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. मुख्यमंत्री म्हणजे करप्ट मॅन असा अर्थ होतो का, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
रस्त्याची कामं पूर्ण करण्यासाठी खडी पुरवठा एका ठराविक पुरवठादारांकडूनच झाला पाहिजे, अशी अनौपचारिक चर्चा आहे. या विषयावर मुख्यमंत्री यांनी व्हाईट पेपर काढून माहिती द्यावी की नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे. पर्यावरणाची हानी होत आहे की विकास? देशभरात प्रचार करत असताना भाजपचा महाराष्ट्रावर का इतका राग आहे. एक असं सरकार आमच्या डोक्यावर बसवलं आहे की केवळ घोटाळे करत आहेत, अशी जोरदार टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.