मुंबई : लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' हा विशेष कार्यक्रमात दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यादरम्यान, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर आले असता त्यांनी हातमिळवणी केली आहे. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारले असता आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी झाली असल्याचे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी झाली आहे. मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्ये मला का ठेवलं आहे? यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी की वाढवण्यासाठी, असे मिश्कील विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.