राज्याच्या राजकारणात एकीकडे राजकीय घडामोडी तीव्र होत असताना, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून हे शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार असे भाकीत वारंवार केले जात आहे. त्यावरूनच मंत्री अब्दुल सत्तर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सामान्य माणूस मुख्यमंत्री झाल्यानंतर खानदानी सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या राजकारण्यांना त्रास होतो. अशी जोरदार टीका यावेळी सत्तार यांनी केली आहे.
काय म्हणाले सत्तार?
मुंगेरीलाल के हसीन सपने असतात.विरोधी पक्षामध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. ही अडीच वर्ष आहेत. लोकशाही मध्ये लोकांच्या मताने सरकार येते.निवडणुका होतील तेव्हा 40 चे 80 होतील. एकही आमदार कमी होणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम आहेत. अजित दादा जयंत पाटील निराशे पोटी बोलत आहेत. त्यांनी सत्तेत स्वतचा सद उपयोग आणि दुसऱ्यांचा दुरुपयोग केला. सामान्य माणूस मुख्यमंत्री झाल्यानंतर खानदानी सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या राजकारण्यांना त्रास होतो. अशी टीका कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली आहे.
काय म्हणाले होते अजित पवार आणि जयंत पाटील?
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनानंतर सरकार कोसळणार असल्याचे भाकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. तर अजित पवार यांनीही आकड्यांचे गणित मांडून सरकार कोसळू शकते, असं वक्तव्य केले होते. त्यावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.