राजकारण

मी म्हणालो होतो रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा : अब्दुल सत्तार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर असून त्यांची जाहीर सभा होणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी उध्दव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी उध्दव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचले आहे. अडीच वर्षात मुख्यमंत्री फक्त 4 वेळेस त्या खुर्चीवर बसले. मी म्हणालो होतो रश्मी ताई ठाकरेंना मुख्यमंत्री करा, असे म्हणत सत्तारांनी निशाणा साधला आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, रश्मी ताई ठाकरेंना मुख्यमंत्री करा. किमान त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. म्हणजे जनतेचीं कामं होतील. अडीच वर्षात मुख्यमंत्री फक्त 4 वेळेस त्या खुर्चीवर बसले, असं टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. मला चालून काय उपयोग होतो. शरद पवार आणि सोनिया गांधी यांना चालायला हवं, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.

बुलढाणा दौऱ्यावरुनही अब्दुल सत्तार यांनी उध्दव ठाकरेंनी लक्ष्य केले. उध्दव ठाकरे यांना आता पश्चाताप होत असेल. काय चुकलं याचा अभ्यास करायला उद्धव ठाकरे यांचा दौरा असावा. हेच आधी केलं असतं तर एवढी वाईट वेळ आली नसती, अशी टीका त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी हात दाखवला की नाही हे त्यांना विचारा. त्यांच्या मनगटात खूप ताकत आहे. त्यांना कुणाला हात दाखवायची गरज नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार दोघे मिळून घेतील. घर चालवताना देखील नाराजी होत असते. कोण कुणाला हात दाखवतो हे निवडणुकीत बघू. त्यांची निशाणी हात आहे, असा निशाणाही त्यांनी शिवसेनेवर साधला आहे.

तर, कामाख्या देवीच्या दर्शनाला हे कोणाचा बळी द्यायला चालले आहेत?, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विचारला होता. याला अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रेड्याचा बळी देणे ही धार्मिक भावना आहे. अजित पवार अजून तिकडे गेले नाही. अजित पवारांनी त्यांच्या बारामतीचा एखादा रेडा घेऊन जाऊन बळी द्यावा, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट