राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या लास्ट वॉर्निंगनंतर अब्दुल सत्तार अलर्ट मोडवर; म्हणाले, अधिकच बोललो तर...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सचिन बडे | औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना लास्ट वार्निंग दिली होती. यानंतर अब्दुल सत्तार हे चांगलेच अलर्ट झाले आहेत. त्यांनी आता अधिकचे राजकीय भाष्य करण्यास नकार दिला आहे.

अब्दुल सत्तार हे मागील काही काळापासून आपल्या विधानाने चांगलेच चर्चेत येत होते. परंतु,अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य करताना शिवागाळ केली. सत्तारांच्या या विधानाने राजकारणात प्रचंड खळबळ माजली होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात येत होती. तर, भाजप नेत्यांनीही सत्तारांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना शेवटचा इशारा दिला. यानंतर सत्तार चांगलेच अलर्ट झालेले दिसत आहेत.

मराठवाडयातील पीक नुकसानीचा अब्दुल सत्तारांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीतनंतर पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारले असता कोणतेही राजकीय भाष्य करण्यास नकार दिला. तर, सत्तार यांनी केवळ राऊत यांच्या जामीनाबाबत मात्र भाष्य केले. ते म्हणाले, राऊत यांना माझ्या शुभेच्छा. पण, ते वाघ आहे की नाही हे मला माहित नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, अधिकच बोललो तर तुम्ही मला अडकवाल, असेही अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे.

काय केले होते सत्तारांनी वादग्रस्त विधान?

सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. तर, सत्तारांनी इतकी भि***ट झाली असेल तिलाही देऊ, अशा शब्दात उत्तर दिले.

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग