राजकारण

आम आदमी पक्षाचं ठरलं! द्रौपदी मुर्मुंचा सन्मान, पण...

Published by : Sudhir Kakde

दिल्ली : आम आदमी (AAP) पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Elections) कोणाला पाठिंबा द्यावा, याबाबत चर्चा झाली. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनाच पक्षाने पाठिंबा देण्याचा निर्णय शेवटी घेतला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पक्ष पाठिंबा देईल, असं आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सांगितलं. "आम्ही द्रौपदी मुर्मूंचा आदर करतो, पण आम्ही यशवंत सिन्हा यांना मतदान करू," असं ते म्हणाले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी होणार मतदान

आम आदमी पक्षाच्या या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह, पंजाबचे खासदार राघव चढ्ढा आणि आमदार आतिशी यांच्यासह पीएसीचे इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात सत्ता असलेला आप हा एकमेव बिगर-भाजप आणि बिगर काँग्रेस पक्ष आहे, 'आप'चे दोन्ही राज्यांतून 10 राज्यसभा खासदार आहेत, त्यापैकी तीन दिल्लीचे आहेत. तसेच, पक्षाचे पंजाबमध्ये 92, दिल्लीत 62 आणि गोव्यात दोन आमदार आहेत.

Women's T20 WC 2024: आयसीसीने T20 विश्वचषकासाठी स्पेशल थीम सॉन्ग केले लॉन्च

Sharad Pawar: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; शरद पवारांचं ट्विट करत सवाल...

Chitra Wagh: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Amol Mitkari: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Varsha Gaikwad: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया