राजकारण

नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रकल्प येतील : मुख्यमंत्री शिंदे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सुरेश काटे | कल्याण : वेदांता फॉक्सकॉननंतर पाच मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर पडल्यानंतर नजीकच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात प्रकल्प येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. डोंबिवली मधील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, अदानी, अंबानी, टाटा त्यांच्याशी भेट झाली आहे. अनेक उद्योगपती बरोबर भेट होतेय. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेही या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत यासाठी प्रयत्न करतोय आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आम्हाला आश्वस्त केले आहे. नजीकच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात प्रकल्प येतील, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, डोंबिवलीच नाही तर मुंबई एमएमआरमधील जे शहर आहेत त्या सर्व शहरांमध्ये ग्रामीण भागात देखील खड्डे हा प्रामुख्याने लोकांना भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या सरकारने रस्त्यांना प्राधान्य दिले मी जसं मुंबई एमएमआर प्रायोरिटीने घेतलं इतर शहरातील आयुक्तांना रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खड्डेमुक्त रस्ते लोकांना देण्याचे जबाबदारी आमची आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करणे आणि इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर पुढे नेणे, रस्ते, उड्डाणपूल याला प्राधान्य आम्ही दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, डोंबिवली मधील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात आले होते. काही दिवसांपूर्वीच या शाखेचा ताबा हा शिंदे गटाने घेतला होता. या शाखेत मुख्यमंत्री येणार म्हणून फुलांची सजावट करण्यात आली होती. एकनाथ शिंदे शाखेमध्ये जाताना त्यांनी पायरीवरच ते नतमस्तक झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. डोंबिवली शिवसेना शाखेचे नामकरण बाळासाहेबांची शिवसेना करण्यात आले आहे.

Mumbai Metro-3 | पहिली भूमिगत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत;पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण

Navratri 2024: "या" कारणामुळे नवरात्री 9 दिवस साजरी केली जाते, जाणून घ्या...

Tripal Talaq: मुंबईतील ट्रिपल तलाक प्रकरण; तलाक प्रकरणातील आरोपीवर डोंबिवलीत गुन्हा

Rain Update: पुढील तीन तासात 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता; रेड अलर्ट जारी

Navratri 2024: नवरात्रीदरम्यान जवसाचे धान्य पेरण्या मागे काय आहे कारण; जाणून घ्या...