राजकारण

आव्हाडांवर गुन्हा दाखल! पत्नीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’...

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण आता चांगलेच तापले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण आता चांगलेच तापले आहे. याविरोधात राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. तर, राजकीय वर्तुळातूनही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील आरोपानंतर पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात. आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

जे काही घडलं ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया (spontaneous reaction) होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तीला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’होत असतील, असे ऋता आव्हाड यांनी म्हंटले आहे.

ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. राष्ट्रवादी व आव्हाडांविरोधात त्या आक्षेपार्ह बोलल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांसमोर मला अपमानित केलं. 'तू इथं काय करतेस' असं माझा हात पकडून म्हटलं. मी एक महिला असून अशाप्रकारे महिलेचा सर्वांसामोर अपमान करण्यात आला. पोलिसांनी याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी रशीद यांनी केली आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी थेट राजीनाम्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी अत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय