राजकारण

कोविड घोटाळ्याबाबत मोठी बातमी; किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Published by : Siddhi Naringrekar

कोविड घोटाळ्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बॅाडी बॅग खरेदी प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. १५०० रूपयांची बॅाडी बॅग ६७०० रूपयांना खरेदी केल्याचे प्रकरण आहे. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांचा हात असल्याचा आरोप माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केला होता.

मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2000 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ED) म्हटलं आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. ईडीने 21 जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं अंमलबजावणी संचलनालय (ED) म्हणणं आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा