Uddhav Thackeray : शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना 23 ऑगस्टपर्यंत सगळी कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याआधीही उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांची मुदत मागितली होती, पण निवडणूक आयोगाने दोन आठवड्यात म्हणजेच 23 ऑगस्टला कागदपत्रं सादर करण्याचे आदेश ठाकरेंना दिले होते. (A big relief to Uddhav Thackeray, the Election Commission accepted the demand)
२५ ऑगस्टला होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. तोपर्यंत सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला कोणताही निर्णय घेऊ नये, असं आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर पडली असली तरी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेला कागदपत्रं सादर करण्यासाठी ४ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांनंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आपणास कागदोपत्रे सादर करण्यास ४ आठवडे मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेनेनं केली होती. सर्वोच्च न्यायालयात सध्या हे प्रकरण असून आम्हाला तोपर्यंत १ महिन्याची मुदतवाढ द्यावी, असे शिवसेनेनं आयोगाकडे दिलेल्या पत्रात म्हटले होते. आता, केंद्रीय निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली असून ४ आठवड्यांचा अवधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे.